मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावच नाही

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावच नाही

नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प सूरू करण्याचा केद्र सरकार विचार करीत असले तरी केंद्राकडून राज्य सरकारला याबद्दलचा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात सदस्य शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप आदी सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. यावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरात परिवहन मंत्री रावते यांनी रेल्वे मंत्रालयाने अ‍ॅडीफ इनको या स्पॅनिश कंपनीची मुंबई-नागपूर जलदगती रेल्वेमार्ग प्रकल्पाचा सुसाध्यता अभ्यास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. हे केंद्र सरकारच्या विचाराधिन असून अद्याप राज्य सरकारला केंद्र सरकारकडून या संदर्भात कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. असे रावते यांनी स्पष्ट केले.

Previous article……जेव्हा परिवहन मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वाट चुकतो
Next articleधमक्या देणे थांबावा ! अन्यथा बळीराजा सरकार उध्वस्त करेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here