“गिरीश महाजन हा गडी  वस्ताद आहे”

“गिरीश महाजन हा गडी  वस्ताद आहे”

अजित पवारांच्या कोपरखाळीने सभागृहात हशा

नागपूर:  गिरीश महाजन हा गडी वस्ताद आहे. जो माणूस हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधू शकतो त्याला डुक्कर “किस झाड की पत्ती है” अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारताच सभागृहात एकच हशा पिकला.

नुकताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हातात बंदूक घेऊन बिबट्याला शोधत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचा आधार घेत अजित पवार यांनी महाजन यांना कोपरखळी मारली. डुक्कर वाढली आहेत त्यामुळे शेताचे नुकसान होत आहे. या गड्याला अजून एक पिस्तुल द्या त्यामुळे शेतीचे तरी नुकसान होणार नाही असे म्हणत  पवार यांनी गिरीश महाजन यांची सभागृहात अँकटिंग करून दाखवली.राज्य हे अधिकाऱ्यांचे ऐकून चालत नाही त्यासाठी स्वतःची धमक दाखवावी लागते असा टोला  पवार यांनी भाजपाच्या मंत्र्यांना लगावला.अधिकारी एक सांगतात आणि मंत्री दुसरे सांगतात असे सांगत नेहमीच अधिकाऱ्यांचे ऐकू नका असा सल्ला देखील  पवार यांनी यावेळी भाजपा मंत्र्यांना दिला.  विधानसभेमध्ये अजित पवार बोलत होते त्यावेळी त्यांनी सुभाष देशमुख यांना किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली याचे आकडे तुमच्या कडे नाहीत. त्यात तुमचे अधिकारी दिशाभूल करत आहेत असे सांगत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

Previous articleविधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने
Next articleमुंबई बँकेची आर्थिक स्थिती चांगली