आता आपले सरकार आहे; मागण्या पूर्ण करा !
खडसे यांचा घरचा आहेर
नागपूर : आपण आता सत्तेत आहोत,त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. सरकार हातात असताना मागण्या मान्य करा ,विरोधी पक्षात असताना माझ्यासह मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न लावून धरले होते,अशा शब्दात भाजप ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
विरोधी पक्षात असताना माझ्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्न लावून धरले होते, आता सत्तेत आल्यानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. आता आपलेच सरकार असताना मागण्या मान्य करा अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रोजगार हमीची कामे निधी अभावी प्रलंबित असल्याचा तारांकित प्रश्न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना खडसे बोलत होते. रोजगार हमीची कामे निधी अभावी कशी रखडतात, त्या योजना या ग्रामीण भागातील शेत मजुरांना रोजगार मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम आहे. शेत मजुरांना अकुशल कामगारांचा दर्जा देण्याचा कायदा अस्तित्वात आहे. अश्या कामगारांना त्वरित राज्य सरकार ने आवश्यक भत्ते दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावर उत्तर देणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ही खडसे यांनी काय उत्तर द्यावे आशा विवंचनेत दिसल्या.मात्र लवकरच चौकशी करून रोजगार हमी योजनांच्या रेंगाळलेल्या कामाचा आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.