२१ फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत

२१ फेब्रुवारीला राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत

पुणे : जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’  हे १५ वे जागतिक संमेलन जानेवारी महिन्यात संपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे घेणार होते. मात्र, भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेमुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. शरद पवार यांची ही बहुप्रतिक्षित मुलाखत येत्या २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

२१ फेब्रुवारी रोजी, संध्याकाळी ५ वाजता, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी), डेक्कन, पुणे येथे ही मुलाखत होणार असून, ही मुलाखत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती  जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी  या संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर, सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुक्त संवाद…. दोन पिढ्यांचा या विशेष संकल्पनेवर आधारित  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची ही मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यातून पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडला जाणारा आहे. या मुलाखतीव्दारे रसिकांना एका मनमोकळ्या आणि महाराष्ट्राची स्थिंतत्यरे सांगणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा संवादाचे साक्षिदार होण्याची संधी मिळणार आहे. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  तसेच कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील योगदान देणा-या मराठी व्यक्तींचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे. ही मुलाखत आणि पुरस्कार वितरण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यानी केले.

Previous articleविदर्भ, मराठवाड्यात येत्या ४८ तासात वादळीवाऱ्यासह गारपीटीचा अंदाज
Next articleमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोंदींवर निशाणा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here