एसटी भरती : “ड्रायव्हिंग टेस्ट” मध्ये नापास झालेल्यांची पुन्हा चाचणी घेणार

एसटी भरती : “ड्रायव्हिंग टेस्ट” मध्ये नापास झालेल्यांची पुन्हा चाचणी घेणार

परिवहनमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय

 मुंबई  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गेल्यावर्षी कोकण विभागात चालक तथा वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी जाहिरात दिली होती. या पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण मात्र चालन चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुन: चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज  लक्षात घेऊन नव्याने ३ हजार पदांची भरती करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी निवेदनाद्वारे विधानसभा तसेच विधानपरिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गतवर्षी कोकण विभागात चालक तथा वाहकांच्या ७ हजार ९२९ पदांसाठी जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना चालन चाचणीकरिता पाठवण्यात आले होते. मात्र काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींनी यांनी अनुत्तीर्ण झाल्यामुळे अपात्र ठरविलेल्या उमेदवारांची पुन: चालन चाचणी घेण्याची मागणी केली आहे. कोकण प्रदेशातील चालक तथा वाहक पदाच्या रिक्त जागा तातडीने भरणे आवश्यक आहे. या बाबीचा विचार करुन महामंडळाने चालन चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुन्हा नव्याने चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच किरकोळ त्रुटीमुळे चालन चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा छाननी करुन त्यांना संधी देण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

Previous articleसरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हाती ‘लेखी जुमला’च दिला
Next articleसरकारने सिंचनाची खरीखुरी आकडेवारी जाहीर करण्याचे मुंडेंचे आव्हान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here