महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर उर्फ राजा सरवदे यांना महाराष्ट्र्र शासनाचा राज्यमंत्री दर्जा आज अधिकृत जाहीर करण्यात आला. रिपाइं चे महाराष्ट्र्र राज्य सरचिटणीस असणारे तथा गेली चार दशके रामदास आठवलेंचे निष्ठावंत म्हणून राजा सरवदे यांचे ओळख आहे.आंबेडकरी चळवळीत ज्येष्ठ नेते म्हणून आदराचे स्थान प्राप्त केलेल्या राजा सरवदे यांना राज्यमंत्री दर्जा मिळाल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतून त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. रिपब्लिकन चळवळीत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर ला रिपब्लिकन पक्षाच्या ६१ व्या वर्धापन दिन मेळाव्यात रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंना तीन दिवसांत राजा सरवदे यांना राज्यमंत्री दर्जा देणारा शासन निर्णय काढणार असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला आहे. तसेच राजा सरवदे यांना मंत्रिपद देणार असल्याचे त्यांच्या वाढदिवशी २६ ऑगस्ट ला सोलापूरात ना रामदास आठवलेंनी दिलेले आश्वासन आजच्या शासन निर्णयामुळे पूर्ण झाले आहे.

राजा सरवदे यांना मंत्री करण्याचा रामदास आठवलेंनी दिलेला शब्द खरा करून दाखविल्याबद्दल समग्र आंबेडकरी चळवळीत आठवलेंच्या नेतृत्वाबद्दल कौतुक केले जात आहे. तसेच राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळल्याबद्दल राजा सरवदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleआ.तुकाराम कातेंवरील हल्ला ठेकेदारीतून : नवाब मलिक
Next articleराष्ट्रवादीचा सरकारविरोधात १५ ते २० ऑक्टोबरला राज्यभर एल्गार