घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीतच आरक्षण द्या :अजित पवार

घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीतच आरक्षण द्या :अजित पवार

मुंबई दि.२० घटनात्मक पेच निर्माण होणार असेल, तर आरक्षणाचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेऊ नका. आरक्षण देताना घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीतच आरक्षण द्या,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसेचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

पवार म्हणाले की, २८८ आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे; मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ५२ टक्क्यांना धक्का न लावत आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाला आज त्यांच्यातील हिस्सा काढून मराठा समाजाला आरक्षण दिले जात असल्याची भावना निर्माण होत आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल ‘टीस’ने मांडला आहे. तो अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवा, कारण मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला निवडणुकीआधी पहिल्या अधिवेशनात आरक्षण देऊ, असे म्हटले होते. आता टीसने आपल्या अहवालात काय मांडले आहे, हे सरकारने सांगावे तसेच मुसलमानांसाठी शिक्षणातील आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. त्याविषयीही सरकारने भूमिका मांडावी अशी मागणी पवार यांनी केली.

Previous articleहिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा !
Next articleआम्हाला चर्चा नको…आधी मदत जाहीर करा- धनंजय मुंडे