उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.येत्या रविवारी १ डिसेंबर रोजी शिवतीर्थावर होणा-या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक ट्रायडंट या हॅाटेल मध्ये पार पडली या बैठकीला तिन्ही पक्षांचे आमदार, नेते उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्य बाळासाहेब थोरात, घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्ष नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला याला एकमताने मंजूरी दिल्याने आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस, घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडी नाव देण्याचा ठराव पारीत करण्यात आला आहे.येत्या रविवारी १ डिसेंबर रोजी शिवतीर्थावर होणा-या सोहळ्यात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
ठाकरे घराण्यातील पहिला आमदार होण्याचा मान आदित्य ठाकरे यांनी मिळावल्यानंतर ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री प्रथमच होणार आहे.महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा शिवतीर्थावर होणार आहे. मात्र या सोहळ्यास हे मैदान पुरेल का असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.