राणे मंत्री होणारच ! सरकारही स्थिर राहणार
गिरीश बापट
नाशिक दि.१० माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे मंत्री हे होणारच असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी करतानाच राणे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून येणार आणि फडणवीस सरकार स्थिर राहणार असेही बापट म्हणाले. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
कुणी या किंवा जा, आमचे सरकार हे आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचे सरकार स्थिर असून, नेतृत्व खमके आहे.”, असेही बापट म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही अडचण असली तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात, असेही बापट यांनी स्पष्ट केले.आघाडी सरकारने दिलेल्ये कर्जमाफीचे पैसे तब्बल १८ महिन्यांनी मिळाले होते. फालतू लोकांनी पैसे लाटू नये ही आमची इच्छा म्हणून कर्जमाफीला उशीर झाला, असे बापट यांनी सांगितले.