अडचणीत असलेल्या बॅका ऐवजी बलदंड बॅकांना केंद्राची मदत

अडचणीत असलेल्या बॅका ऐवजी बलदंड बॅकांना केंद्राची मदत

शरद पवार यांची टिका

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारचा सहकार विभागाविषयी चांगला दृष्टीकोन नसून,अडचणीत असलेल्या सहकारी बॅकेंना मदत करण्याऐवजी बलदंड राष्ट्रीय बँकांना मदत केली जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.

डेक्कन मर्चट को ऑपरेटीव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात पवार बोलत होते. ज्यावेळेला औषध हवे आहे त्यावेळेस औषध दिले जाते नाही तर पेंशटवर जास्त बंधने घालून गडबड केली जाते असा टोलाही पवार यांनी लगावला. सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव आडसूळ यांनी केंद्र सरकारच्या सहकारी धोरणावर नाराजी व्यक्त केली. सहकारी बॅकाबाबत वित्तमंत्री अरूण जेटली काम करतो म्हणतात पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. सत्तेत असूनही सत्तेत नसल्यासारखं वाटते, आता तर आम्ही निवडणूक स्वबळावर ल लढवायचे ठरविल आहे, असे अडसूळ यांनी सांगत शरद पवार यांच्या सारखे नेते सरकार चळवळीला कायमच मदत करत असतात त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे असेही अडसूळ म्हणाले.

सध्या सहकाराकडे पाहण्याच दृष्टिकोन वेगळा होताना दिसत आहे. चार पाच लोकांकडून चूक होते परंतु त्याची किंमत सर्वांना भोगावी लागते अशा परिस्थितीत सरकारने मात्र पाठीशी राहीले पाहिजे.अशी अपेक्षा पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.बॅंक अडचणीत आली की सहकार्य करण्याऐवजी बंघने घातली जातात, काही तरी गडबड आहे असे वाटत असल्याने ग्राहकांना त्यामुळे अजून अडचण वाटते. बॅकांना संकटातून बाहेर काढण्याच काम बाजूला राहते आणि समस्या वाढतात. सामान्य माणसाला मदत करण्याचे काम सहकार क्षेत्राचे असून, सहकारी चळवळ टिकवण्याचे काम केले पाहिजे त्यामध्ये राजकारण न आणता मदत केली पाहिजे असेही पवार म्हणाले. सहकार चळवळींनी आता एकत्रित यायला हवे, आर्थिक शिस्त बाळगायला हवी त्यामुळे बॅका अडचणीत येणार नाहीत असेही पवार यांनी सांगितले.

Previous articleमहाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला केंद्राचा पुरस्कार जाहीर
Next articleतोडपाणीच्या पैशातून सत्कार करून घेणे विरोधी पक्षनेत्यांना शोभते का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here