धनंजय मुंडेंनी  हातात कुदळ घेऊन केले ३ तास श्रमदान

धनंजय मुंडेंनी  हातात कुदळ घेऊन केले ३ तास श्रमदान

परळी : व्यासपीठावरून तडाखेबाज भाषण करणारे आणि विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी करणा-या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी सकाळी हातात कुदळ घेऊन परळी तालुक्यातील ३ गावात ३ तास सक्रिय  श्रमदान केले. आपला नेताच श्रमदानासाठी पुढे सरसावला आहे म्हटल्यावर गावकऱ्याचा उत्साहही द्विगुणीत झाला आणि बघता बघता सारा गाव श्रमदानासाठी जमा झाला.

वॉटरकप स्पर्धेत परळी तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला असून गेली काही दिवसापासून येथे गावकरी श्रमदान करीत आहेत. गुरूवारी सकाळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रेवली गावात पोहोचले. यावेळी त्यांचा पेहरावही नेहमीपेक्षा वेगळाच होता. नेहरू शर्ट आणि पायजम्यात नेहमी दिसणारे मुंडे अंगात टी-शर्ट आणि स्पोर्ट पॅन्ट घालून आले होते. रेवली गावात पोहोचल्यावर त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती गावकऱ्याकडून घेतली आणि त्यानंतर हातात कुदळ घेऊन श्रमदानही केले.या वेळी त्यांनी डोक्यावर पाटी घेऊन मातीही टाकण्याचे काम केले.

दुष्काळ आणि पाणी टंचाईचे कामयस्वरूपी निर्मुलन करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या परळी विधानसभा मतदारसंघातील रेवली, मलनाथपुर, परचुंडी या तीन गावांमध्ये त्यांनी ३ तास श्रमदान केले. आज सकाळी ७ वाजता त्यांनी रेवली या गावातून गावकऱ्यांसह श्रमदान करायला सुरुवात केली पुढे मलनाथपुर आणि परचुंडी या गावातही त्यांनी श्रमदान केले. वॉटरकप स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या गावांना स्वतः श्रमदान करून त्यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांच्या समवेत जि. प. सदस्य अजय मुंडे, परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाजार समितीचे संचालक राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, प.स. माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, प.स. सदस्य वसंत तिडके, पाणी पुरवठा सभापती भाऊड्या कराड, चंद्रकांत कराड, शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने या श्रमदानात सहभागी होते.

पुढील तीन दिवस धनंजय मुंडे हे मतदार संघातील विविध गावांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन  श्रमदानात सहभागी होणार आहेत ही स्पर्धा कोणीही जिंको त्यापेक्षा पाण्याची चळवळ यशस्वी होणे आणि गाव टंचाईमुक्त होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या गावांमध्ये सुरू असलेला कामांसाठी लागणारे डिझेल तसेच इतर साहित्यही देण्यात येणार आहे.

Previous articleफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा
Next articleलोकसभा विधानसभा पोटनिवडणूकांचा कार्यक्रम घोषित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here