मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुहास पेडणेकर

मुंबई :  रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.

डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत  करण्यात आली आहे.गेल्या वर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ  देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. डॉ श्यामलाल सोनी, संचालक, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, पौडी गढवाल, उत्तराखंड व भूषण गगराणी, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको हे समितीचे अन्य सदस्य होते.

Previous articleराहूल आवारेला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत
Next articleकर्नाटक निवडणूकीसाठी पंकजा मुंडे स्टार प्रचारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here