“विको” ठरला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड

“विको” ठरला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड

मुंबई : महाराष्ट्रातील ब्रॅण्डच्या खुल्या ग्राहक तपासणी उपक्रमात महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड म्हणून “विकोची” एकमताने निवड करण्यात आली आहे. विको ब्रॅण्ड हा ग्राहकांमध्ये एक विश्‍वसनीय ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो.

अर्थसंकेत, नीवस्टोन अँड एजन्सी आणि जी- ५ वेब सर्व्हिसेस यांच्याद्वारे संयुक्तपणे एक स्वतंत्र ग्राहक जागरुकता उपक्रम राबविला गेला, ज्यामध्ये विकोला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड म्हणून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात बहुतेक सर्व अग्रगण्य ब्रॅंण्ड सहभागी झाले होते. हा उपक्रम राबविण्यामागील मुख्य उद्देश हा उपलब्ध ब्रॅण्डची सद्यस्थिती तपासणे आणि ग्राहकांच्या मनातील या ब्रॅण्डची विश्वासार्हता प्रमाणित करणे हा होता. आपल्या शीरपेचात खोवल्या गेलेल्या या नविन पुरस्काराबद्दल बोलताना विकोचे संजीव पेंढरकर म्हणाले “खास करून ग्राहक सर्वेक्षणाच्या आधारावर असा पुरस्कार मिळणे ही आमच्याकरिता खरोखरच अत्यानंदाची” बाब आहे. आमच्या ग्राहकांच्या हृदयात तसेच घरांमध्ये या ब्रॅण्डच्या असलेल्या स्थानाला या पुरस्कारामुळे पुष्टी मिळते. अशा पुरस्कारांमुळेच आमच्या ग्राहकांची या ब्रॅण्डवर असलेल्या विश्वासाची आम्हांला जाणीव होते आणि पयार्याने हा विश्‍वास असाच दृढ रहावा याकरिता आमच्या उत्पादनांची गुणवत्ता अधिकाधिक दर्जेदार राखण्याकडे आमचे लक्ष केंद्रित होते.

हा भव्य सोहळा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मिलिंद लांजेवार, शशिकांत खामकर, अशोककुमार चौहान, शंकर जाधव, अजय ठाकूर, बाळासाहेब कांबळे, सुधीर साळवी, पंकज विष्णू आणि कौशल इनामदार हे उपस्थित होते.

 

Previous articleकिराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली
Next articleविलास पोतनीस कपिल पाटलांच्या विजयाची औपचारिकता बाकी