कोकणात भाजपकडून सुरेश प्रभू यांना उमेदवारी ?

मुंबई नगरी टीम

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते सुरेश प्रभू यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. येथून प्रभू यांना उमेदवारी मिळावी, असा ठराव जिल्हा भाजप करणार असल्याचे माजी आमदार आणि प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी सांगितले.

पालकमंत्री दीपक केसरकर हे जिल्ह्याचा विकास करण्यात पूर्ण अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला.भाजपकडून प्रभू यांच्या नावाचा विचार व्हावा असे ठराव येत आहेत.पालकमंत्री केसरकर विकासकामे करण्यात अपयशी ठरले असून त्यांची तक्रार ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तिलारी प्रकल्पात घोटाळा अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने झाला, असा जोरदार दावा त्यांनी केला.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.

Previous articleभारतीय बहुजन क्रांती दल लोकसभेच्या २२ जागा लढविणार
Next articleमहागठबंधनमध्ये स्थान नाकारल्याने मनसेचे एकला चलो ?