भाजपाच्या या उमेदवारांनी अर्ज दाखल केले

भाजपाच्या या उमेदवारांनी अर्ज दाखल केले

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : नागपूर मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

चंद्रपूर येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.बीड येथे खा.डॉ. प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, ग्रामविकासमंत्री पंकाजा मुंडे आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेना प्रवक्त्या आ. नीलम गोरे उपस्थित होते.

अकोला येथून खा. संजय धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून सोमवारी खा. अशोक नेते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

Previous articleपालघरमध्ये भाजप खासदार लढणार शिवसेना चिन्हावर ?
Next articleरणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा भाजपामध्ये प्रवेश