मनोज कोटक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मनोज कोटक आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक  आज आपला उमेदवारी  अर्ज दाखल करणार आहेत.मुलूंड पश्चिमेच्या एम.जी. रोड, येथील अंबाजी धाम येथून मिरवणुकीद्वारे वाजत गाजत मिरवणुकीद्वारे ते निवडणुक कार्यालयात पोहोचणार आहेत. यावेळी भाजपचे सर्व जिल्हा, मंडळ व वार्ड स्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. या शिवाय मतदारसंघातील शिवसेना, रिपाई, तसेच रासपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना ते मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन काल रविवारी करण्यात आले. घाटकोपर पुर्वेला असलेल्या टिळक रोडवरील भानुशाली वाडीत हे कार्यालय असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे सर्व जिल्हा, मंडळ व वार्ड स्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिका-यासह  मतदारसंघातील शिवसेना, रिपाई, तसेच रासपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविरोधक सध्या सैरभर झालेत : विनोद तावडे
Next articleदक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसचा पदयात्रांवर भर