भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी मंत्री तानाजी सावंत यांचे खेकडयांवर खापर

भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी मंत्री तानाजी सावंत यांचे खेकडयांवर खापर

मुंबई नगरी टीम

मुंबई : मोठया भ्रष्ट माशाला वाचवण्यासाठी खेकडयावर खापर फोडू नका असे सांगतानाच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येवून  दोषी आमदाराला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी तिवरे धरण फुटीमध्ये दोषी असलेल्या स्वतः च्या आमदाराला वाचवण्यासाठी खेकडयांवर  खापर फोडले आहे असा आरोप करीत नवाब मलिक यांनी मंत्री तानाजी सावंत  यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.मंत्री तानाजी सावंत यांनी खेकडयांवर केलेला आरोप हा निर्लज्जपणाचा कळस आहे. स्वतः च्या आमदाराला यातून बाहेर काढण्यासाठी केलेले वक्तव्य आहे हे जनता सहन करणार नाही असेही मलिक म्हणाला तानाजी सावंत आपल्या आमदाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असून या सगळ्या प्रकरणात शिवसेनेचा आमदार दोषी असल्याचे समोर येत असून त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

Previous article“त्या”खेकड्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा
Next articleनवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प