राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा तुर्तास स्थगित

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा तुर्तास स्थगित

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्यात निर्माण झालेली पुरपरिस्थिती लक्षात घेता भाजपाच्या महाजनादेश यात्रेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आजपासून तुर्तास स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर, सांगली, साता-यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली महाजनादेश यात्रा थांबविण्याचा निर्णय घेतला असतानाच ६ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्हयाला पुराने वेढले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली शिवस्वराज्य यात्रा आजपासून तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरपरिस्थिती नियंत्रणात आल्यावर या यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असे मलिक यांनी सांगितले.

Previous articleपुरग्रस्तांच्या स्थलांतरणास सर्वोच्च प्राधान्य
Next articleपूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत