उदय सामंत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार

उदय सामंत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  तमाम मुंबईवासीय रत्नागिरीकरांनी शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आणि म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मुंबईवासीय रत्नागिरीकरांचा स्नेहमेळावा शारदाश्रम हायस्कुल दादर येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी मुंबईवासीय रत्नागिरीकरांनी हा निर्धार व्यक्त केला.या मेळाव्याला आमदार उदय सामंत यांच्या  प्रेमापोटी तसेच आपल्या गावच्या आस्थेपोटी अनेक मुबंईकरांनी आवर्जून उपस्थिती लावली. आमदार उदय सामंत यांच्या ” आलेख जनसेवेचा ” हा २०१४  ते २०१९या पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या विकासकामांचा तसेच सामाजिक,सांस्कृतिक,क्रीडासह अनेक क्षेत्रात केलेल्या कामांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन  मुबंईस्थित रत्नागिरीतील बांधवांच्या हस्ते एकत्रीत पणे करण्यात आला. यावेळी आमदार उदय सामंत यांनी आपल्या मनातील विकासाच्या संकल्पना पुढील आमदारकीच्या चौथ्या पर्वात आपल्या मनात असलेला विकासाचा दृष्टीकोन उपस्थितांसमोर सविस्तरपणे विषद केला चौथ्या पर्वासाठी साथ हवी आहे तुमच्या आशीर्वादाची अशी भावनिक साथ घातली. यावेळी तमाम मुबंईवासीयांनी आमदार उदय सामंत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous article…. तोपर्यंत फेटा बांधणार नाही – खा. अमोल कोल्हे
Next articleदुस-यांदा स्थगित करावी लागली महाजनादेश यात्रा