धनंजय महाडिक, जयकुमार गोरे यांच्यासह राणा जगजितसिंह पाटलांचा भाजपात प्रवेश

धनंजय महाडिक, जयकुमार गोरे यांच्यासह राणा जगजितसिंह पाटलांचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजपात प्रवेश करीत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापूरात झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, माण-खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप आज सोलापूर मध्ये झाला यावेळी भाजपाच्यावतीने मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही विरोधकांची झोप उडवणारी यात्रा आहे. तसेच पाच वर्षात काय काम केले याचा हिशोब देण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी आणि सूचना मागण्यासाठी ही यात्रा आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे लवकरच भाजपत प्रवेश करतील, असा दावाही  त्यांनी यावेळी केला.

Previous articleकडकनाथ फसवणूक प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी
Next articleपुढच्या वर्षीही गणपती बाप्पांचं वर्षावरच स्वागत करू : मुख्यमंत्री