धनंजय मुंडे झाले गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक

धनंजय मुंडे झाले गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक

मुंबई नगरी टीम

परळी :  उतणार नाही मातणार नाही, तुम्ही दिलेला जनसेवेचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असा निश्चय करत विधानसभेवर दिमाखदार विजय मिळवणारे धनंजय मुंडे आज स्व.गोपीनाथराव मुंडे, स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.

परळी विधानसभा मतदारसंघातून दैदिप्यमान विजय संपादन केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथगड या समाधीस्थळी जाऊन नमन केले, तसेच वडील स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊनही त्यांनी नमन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही त्यांनी समाधीस्थळी जात आशीर्वाद घेतले होते, त्यानंतर विजयानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी या दोन्ही ठिकाणी जाऊन नमन केले. स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांच्या आठवणीने भावूक होताना त्यांनी उतणार नाही मातणार नाही, स्व.मुंडे साहेब आणि स्व.अण्णांकडून आपल्याला मिळालेला जनसेवा करण्याचा आणि जन संघर्षाचा वारसा सोडणार नाही, असे सांगितले.

Previous articleधनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब!
Next articleदोन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा