आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई: दोन अपक्षांनी शिवसेनेला जाहीर केलेल्या पाठिंब्यानंतर आज अजुन दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी आज मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व पाठिंब्याचे पत्र दिले.
शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयो मधून करणे, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला.सर्वसामान्य नागरिकांच्या , आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या, दिव्यांग्य बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्याने शिवसेनेला पाठिंबा असे आ. बच्चू कडू यांनी सांगितले.प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकतीने शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही आ. बच्चू कडू यांनी दिली.

यापूर्वीच रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.. नरेंद्र भोंडेकर आणि आशिष जयस्वाल हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.

Previous articleविरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे प्रबळ दावेदार
Next articleअडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कसलाच निर्णय झाला नव्हता