एमसीएची सीईटी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सामायीक प्रवेश परिक्षा कक्षाच्या वतीने येत्या २८ मार्च रोजी घेण्यात येणारी पदव्युत्तर संगणक प्रवेश (एमसीए) सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ३० एप्रिल रोजी होणार आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सीईटी परिक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते.म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.एप्रिलमध्ये होणाऱ्या सीईटी परिक्षांबाबत ३१ मार्चनंतर राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नये याबाबत शासनाला सहकार्य करावे आणि सर्वांनी कोरोनासंदर्भात स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी केले.

Previous articleकोरोनाच्या विरोधातले युध्द निश्चित जिंकणार : मुख्यमंत्री
Next articleसरकारने हातावर पोट असणाऱ्यांची व्यवस्था करावी : चंद्रकांत पाटील