सुवर्णसंधी : म्हाडामध्ये तब्बल ५६५ पदांसाठी सरळ सेवा भरती;लगेच अप्लाय करा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध ५६५ पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मध्ये कनिष्ठ लिपिक- टंकलेखक या पदासाठी सर्वाधिक २०७ तर कनिष्ठ अभियंता ( स्थापथ्य) या पदासाठी तब्बल ११९ जागा भरण्यात येणार आहे.या रिक्त पदांसाठी १७ सप्टेंबर २०२१ ते १४ ऑक्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

म्हाडातील विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र उमेदवार या पदांसाठी दि. १७ सप्टेंबर २०२१ ते दि.१४ ऑक्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा सविस्तर तपशील,शैक्षणिक व अनुभवाची अहर्ता,विविध वेतन श्रेणी,सामाजिक,समांतर,दिव्यांग आरक्षण,वयोमर्यादा,शुल्क,नियुक्तीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती, व प्रक्रिया तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील म्हाडाच्या https://mhada.gov या संकेत स्थळावर दि.१५ सप्टेंबर २०२१ पासून उपलब्ध राहतील.

अधिकच्या माहितीसाठी आजच्या विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली म्हाडाची जाहिरात पहावी-

Previous articleमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ; ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढणार
Next articleजिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा