मराठी माणसाला झालेली मारहाण सहन करणार नाही

मराठी माणसाला झालेली मारहाण सहन करणार नाही

नितेश राणे यांचा इशारा

मुंबई दि.२९ अनधिकृत फेरीवाल्या विरोधात मोहिम उघडणा-या मनसेचे मालाडचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्यानंतर काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे आक्रमक झाले असून,“एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणे, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.”, असे म्हणत आ. राणे यांनी काॅग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांना इशारा दिला आहे .

मराठीच्या मुद्यावरून आ. राणे यांनी मनसेच्या कृतीचे समर्थन करीत निरूपम यांना इशारा दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, “मुंबई काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीयांचा पक्ष असल्यासारखे वाटत आहे. आणि त्यांना मराठी माणसांची मतेही हवी असतात.

Previous articleसरकारचे काम आत्मविश्वासाने गावागावात पोहचवा
Next articleयापुढे मनसेला जशास तसे उत्तर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here