डुकरं,नाल्याची घाण म्हणायचं तर दुसरीकडे समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय ? एकनाथ शिंदे संतापले

मुंबई नगरी टीम

मुंबई । मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या भावनांचा आदर करतो,कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाहीआपण या माझ्या समोर बसा,आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.त्यांच्या या आवाहनाचा खरपूस समाचार एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात.आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे,आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत.आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही,माझे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे,आपण या माझ्या समोर बसा,शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल,आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू .कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका,शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही,समोर आलात बोललात तर मार्ग निघेल.शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे .समोर येऊन बोला आपण मार्ग काढू असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंडखोरांना केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटद्वारे उत्तर दिले आहे.एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय असा सवाल शिंदे यांनी केला आहे.

Previous article“मी शिवसेनेतच”,बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना टिकली पाहिजे
Next articleशिवसेनेची वचनपुर्ती : औरंगाबादचे “संभाजीनगर” तर उस्मानाबादचे “धाराशिव” नामांतर