अन..पंकजा मुंडेंनी हायवेवरच्या हॅाटेलात स्वत : चहा बनवत मिसळ पावचा आस्वाद घेतला

मुंबई नगरी टीम

बीड । लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचेशी एकरूप होण्याची किमया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामध्येही असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. आज पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील एका छोटया हॅाटेलमध्ये सर्व सामान्य ग्राहकांसोबत बसून त्यांनी मिसळ-पावचा आस्वाद घेतला आणि स्वतः चहाही तयार केला यावेळी हॅाटेल चालकाची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशीही केली.

पंकजा मुंडे आज सकाळी औरंगाबादहून बीडला जाण्यासाठी निघाल्या असता बीड हायवे वर रस्त्यात असलेल्या हॅाटेल देवगिरी समोर त्यांच्या वाहनाचा ताफा थांबला. पंकजा मुंडे यांना पाहताच हॅाटेल चालक दिपक शिंदे यांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. यावेळी हॅाटेल मध्ये बसलेल्या सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या येण्याचे कुतूहल वाटले. हॅाटेल चालकाच्या आग्रहावरून पंकजा मुंडे यांनी मिसळ-पाव आणि पोहयाचा आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर स्वतः चहा तयार करून घेतला व सोबतच्या कार्यकर्त्यांनाही दिला. यावेळी हॅाटेल चालक तसेच इतर ग्राहकांना त्यांचेसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.पंकजा मुंडेंना पाहताच हॅाटेलमध्ये बरीचशी गर्दीही जमली.सर्वांनी त्यांचेसोबत फोटो काढले. पंकजा मुंडे यांनी देखील सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधला.

Previous articleविरोधकांच्या टीकेनंतर सरकारला जाग ! १०० रूपयांत मिळणा-या दिवाळी पॅकेजचे दोन दिवसात वाटप
Next articleविरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट..भेटी मागील नेमकं कारण काय ?