शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई दि. २३ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेणार आहेत.

आज रात्री साडे आठच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सह्याद्री वर जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटना, कर्जमाफी आणि शरद पवार यांनी नुकताच चार दिवसाचा विदर्भ दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी विदर्भात उद्योग आणण्याची मागणी केली होती. या भेटीत वरील मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

Previous articleचंद्रकांत पाटील विनोद तावडे उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी “मातोश्रीवर”
Next article११ हजार नाभिक समाजाचे कार्यकर्ते मुंडन करून मुख्यमंत्र्यांना केस भेट देणार