पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात

पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसच्या बैठकीला सुरूवात

मुंबई दि.२६   येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानपरिषद पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेसचा उमेदवार ठरविण्यासाठी काॅग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली असून, भाजपच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच काॅग्रेस आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला खा. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अॅड. गणेश पाटील उपस्थित आहेत.विधान परिषद पोटनिवडणुकीकरिता उमेदवाराबाबत या बैठकीत चर्चा सुरू असून, भाजपच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होताच काॅग्रेसच्या उमेदवाराचे नाव घोषित केले जाईल. येत्या ७ डिसेंबरला होणा-या विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी उद्या सोमवार २७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या माफीमुळे नाभिक समाजाचे आंदोलन स्थगित
Next articleभाजप उमेदवाराच्या नावावर आजच्या बैठकीत अंतिम फैसला