प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई दि. २९ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि विधानपरिषद निवडणुकीसाठीचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

येत्या ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केल्यामुळे लाड यांचा विजय म्हणजे औपचारिकता राहिल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबाबत आभार मानण्यासाठी आज लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सदीच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी लाड यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर लाड म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेसह सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांच्या मतांच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे, मात्र त्याशिवाय विरोधकांकडील अधिकची किमान पंधरा मते आपल्याला मिळतील. तसेच या निवडणुकीत अदृश्य बाण नेमके कुणाला मदत करतील हे देखील निकालानंतरच विरोधकांना कळेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. विधान परिषद निवडणुकीत आपल्याला अदृश्य बाणांची मदत होईल, अशा स्वरूपाचे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते.

Previous articleकठोर शिक्षेमुळे योग्य तो संदेश गेला
Next articleपोलीसांच्या गृह प्रकल्पांसाठी ‘आयआयटी’चे सहकार्य