शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी निवडणूक लढवणार ?

शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी निवडणूक लढवणार ?

मुंबई नगरी टीम

 पंढरपूर : माढ्या लोकसभा मतदारसंघाचील निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा ठराव माढ्यात झालेल्या स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला आहे. त्यामुळे माढ्यातुन शरद पवार विरूद्ध राजू शेट्टी अशी लढच होण्याची शक्यचा नाकारता येत नाही.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. आता शरद पवारांविरोधात खा. राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, असा ठराव वेळापूर येथे झालेल्या स्वाभिमानीच्या मेळाव्यात करण्यात आला.स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मतसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.गेल्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी माढा मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’कडून लोकसभेची निवडणुक लढविली होती. त्यांना जवळपास साडेचार लाख मते मिळाली होती. त्यामुळेच पवार यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी निवडुक लढवावी अशी मागणी  स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.या लोकसभेत हातकणंगलेसोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी, असा  आग्रह आजच्या मेळाव्यात करण्यात आला.

Previous articleपोषण आहाराची प्रलंबित बिले मिळावीत : प्रवीण दरेकर
Next articleसुरक्षेच्या कारणास्तव अधिवेशन आटोपते घेतले