माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी

माजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी

 मुंबई नगरी टीम

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांची शिवसेनेत घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविलेले महाले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आज त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  घड्याळाला रामराम करीत शिवबंधन हाती बांधले आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी घरवापसी केली असल्याने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.मात्र धनराज महाले यांना लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या भारती पवार यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनराज महाले यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी महाले हे इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Previous articleमहापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी माझा विनयभंग केला नाही!
Next articleदहीहंडी साजरी न करता पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करा