दहीहंडी साजरी न करता पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करा

दहीहंडी साजरी न करता पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत करा

मुंबई नगरी टीम

मुंबई  : दहीहंडी उत्सव साजरा न करता या उत्सवासाठी येणारा खर्च पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजकांना केले आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, सातारा, कोकणामध्ये पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.अजूनही जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही काळ लागणार आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरुच आहे परंतु माणुसकीच्या दृष्टीने मानवतेचा विचार करून आपण कर्तव्य दक्षतेने त्यांना मदत करावी असेही  मलिक म्हणाले.

मुंबईत मोठया प्रमाणावर श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यावर प्रचंड खर्चही करण्यात येतो. परंतु यावेळी मानवता धर्म म्हणून आपल्या मंडळांनी यावर होणारा खर्च पुरग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी द्यावा असेही  मलिक यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईकरांनो या आवाहनाला प्रतिसाद देवून पुरग्रस्तांना मदतीचा हात देवूया आणि माणुसकी धर्म पाळुया असेही  मलिक यांनी सांगितले आहे.

Previous articleमाजी आमदार धनराज महालेंची शिवसेनेत घरवापसी
Next articleपूरग्रस्त भागातील  “चुली” पुन्हा पेटणार!