मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई नगरी टीम

मुंबई । आष्टी जि. बीड येथिल बापू मोकाशी या ४२ वर्षाच्या तरुणाने आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.मात्र मंत्रालयाच्या प्रांगणात लावलेल्या जाळ्यामुळे या तरूणाचा जीव वाचला.मोकाशी यांच्या प्रेयसीवर अत्याचार झाल्यानंतर तीला न्याय मिळाला नाही त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून त्यांनी सरकार दरबारी अनेक फे-या मारल्या मात्र प्रशासकीय अधिका-यांनी त्याला दाद दिली नसल्याचे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

आज मंत्रिमंडळाची बैठक असल्याने मंत्रालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती.दुपारच्या सुमारास आष्टी जि. बीड येथिल बापू मोकाशी या ४२ वर्षाच्या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथूनच त्यांने आपल्या मागण्या पोलीसांना सांगितल्या.ब-याच प्रयत्नानंतर या तरूणाला पोलीसांनी त्याला खाली उतरवले.हा तरूण किरकोळ जखमी झाला आहे.पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे.मोकाशी यांच्या प्रेयसीवर अत्याचार झाल्यानंतर तीला न्याय मिळाला नाही त्यासाठी गेल्या तीन वर्षापासून त्यांनी सरकार दरबारी अनेक फे-या मारल्या मात्र प्रशासकीय अधिका-यांनी त्याला दाद दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous articleशिक्षकांच्या आंदोलनाला यश : राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान देणार
Next articleसावरकरांबद्दल काँग्रेस आणि शिवसेनेची मते वेगळी; मविआवर परिणाम नाही