५० खोके एकदम ओके… ! विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

मुंबई नगरी टीम

नागपूर । नागपूर मध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली.कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज पुन्हा एकदा ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत सरकारला डिवचले.

कर्नाटक सरकार हाय हाय,बोम्मई सरकार हाय हाय,शिंदे सरकार हाय हाय,गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप,खोके सरकार,खोटे सरकार,५० खोके एकदम ओके,खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय,शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय,महाराष्ट्राची पिळवणूक,गुजरातमध्ये गुंतवणूक.अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदारी विधानभवन परिसर परिसर दणाणून सोडला.आजपासून येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Previous articleनक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही
Next articleराष्ट्रवादीचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांची धमकी