ठराव मंजूर : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर; तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’

मुंबई नगरी टीम

मुंबई । औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’,उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ अशा नावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’,उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ तसेच नवी मुंबई येथील विमानतळाला ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नाव देण्याची शिफारस भारत सरकारला करण्याचा शासकीय ठराव विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर विधानपरिषदेत सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला.औरंगाबाद,उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, आणि धाराशिव नामांतर करण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी.तसेच नवी मुंबई संकल्पित विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा.पाटील असे असावे अशी शिफारस नागरी विमान मंत्रालयास करण्यासंबंधी ठराव आज विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

Previous articleकोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल कॅगच्या अहवालात अजित पवारांचे कौतुक
Next articleशिंदे गटाचे एक कॅबिनेट मंत्री आणि आमदार अडचणीत ? काँग्रेसने केली कारवाईची मागणी