सामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.त्यानुषंगाने राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कोणत्या नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल यांची यादी काल ( गुरूवारी ) सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकानुसार जारी केली.या परिपत्रकात पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल,असे नमुद करण्यात आले होते.राजशिष्टाचारानुसार पुण्याच्या विधानभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.ही चुक लक्षात येताच सामान्य प्रशासन विभागाने आज पुन्हा दुरूस्ती केली आहे.पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत.तर रायगड येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.मंत्रालय येथे मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे असल्याचे सुधारीत परिपत्रकात म्हटले आहे.

येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल यांचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले होते. त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जात असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल असे परिपत्रकात म्हटले होते. मात्र ही चुक लक्षात येताच सामान्य प्रशासन विभागाने चुक दुरूस्त करीत सुधारीत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे तर रायगड येथे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल असे म्हटले आहे.नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण
अमरावती – मंत्री छगन भुजबळ,चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार,रायगड – चंद्रकांत पाटील,वाशिम – दिलीप वळसे-पाटील,अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील,नाशिक – गिरीष महाजन,धुळे – दादाजी भुसे,जळगाव – गुलाबराव पाटील,ठाणे – रविंद्र चव्हाण,सोलापूर – हसन मुश्रीफ,सिंधुदुर्ग – दिपक केसरकर,रत्नागिरी -उदय सामंत,परभणी – अतुल सावे,औरंगाबाद – संदीपान भुमरे,सांगली – सुरेश खाडे,नंदुरबार-विजयकुमार गावीत,उस्मानाबाद- तानाजी सावंत,सातारा – शंभूराज देसाई,जालना – अब्दुल सत्तार,यवतमाळ -संजय राठोड,बीड -धनंजय मुंडे,गडचिरोली – धर्मराव अत्राम,मुंबई उपनगर -मंगलप्रभात लोढा,लातूर -संजय बनसोडे,बुलढाणा-अनिल पाटील,पालघर -अदिती तटकरे,हिंगोली – जिल्हाधिकारी हिंगोली,वर्धा – जिल्हाधिकारी वर्धा,गोंदिया – जिल्हाधिकारी गोंदिया,भंडारा – जिल्हाधिकारी भंडारा,अकोला – जिल्हाधिकारी अकोला,नांदेड-जिल्हाधिकारी नांदेड तर कोकण भवन येथे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील दिलीप ढोले यांची उचलबांगडी; मिरा भाईंदर पालिका आयुक्तपदी संजय काटकर
Next articleतटकरेंच्या एका निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरूद्ध अजित पवार यांच्यात ‘सामना’ रंगणार