मला काही करायचं असेल तर “डंके की चोट पे” करेन : पंकजा मुंडेंचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे.माझ्यासाठी पक्ष हा सगळ्यात महत्वाचा असून,अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही.मी मुद्द्यावर बोलते.मला काही करायचे असेल तर मी ‘डंके की चोट पे करेन’ माझ्यावर अनेक आरोप झाले.मला पराभव पत्करावे लागले असे सांगून,मी माझ्या आयुष्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटले सुध्दा नाही.मी कोणत्याही नेत्याला कोणत्याही पक्षाला माझ्या पक्ष प्रवेशासाठी कधीही भेटले नाही असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.मला राजकारणातून ब्रेक हवा आहे.सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली असून,लवकरच त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.या पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून काँग्रेस प्रवेशाच्या चर्चां फेटाळून लावल्या.मी सांगलीतील एका नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत.मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही.मी त्यांना वैयक्तिक ओळखतही नाही असे स्पष्ट करीत, माझे करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा ? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. यावेळी त्यांनी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचणारांना चांगलेच फटकारले.लाखो लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत,खोटया बातम्यांमुळे लोक संभ्रमात आहेत,खोटया बातम्या देणाऱ्या वाहिनीच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

२०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यानंतर गेले चार वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. अनेक पक्षाचे नेते बोलत होते की, पंकजा मुंडे आल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ मात्र मी सर्व हे सहजतेने घेतले.गेली २० वर्षे मी राजकारणात काम करत आहे.चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत.पंकजा मुंडे पात्र की अपात्र ? पाठित खंजीर खुपसण्याचे रक्त माझे नाही असेही त्या म्हणाल्या.माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात. मला विधान परिषदेला दोन्ही वेळा फॉर्म भरायला सांगितले पण ऐनवेळी सांगितले गेले की फॉर्म भरायचा नाही, मी काही बोलले नाहीं कारण तो पक्षाचा आदेश होता असे त्यांनी सांगितले.भाजपाचा विचार माझ्या रक्तात आहे. पक्ष हा सगळ्यात महत्वाचा आहे माझ्यासाठी.अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी मुद्द्यावर बोलते. मला काही करायचं असेल तर मी ‘डंके की चोट पे करेन’ असेही पंकजा मुंडे यांनी सांगून,मला राजकारणातून ब्रेक हवा आहे.सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Previous articleमविआच्या काळात लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुध्दीतून बंद पाडले
Next article१७ जुलैपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार