भिडे ‘गुरुजी’ असल्याचा काय पुरावा आहे ? त्याचे नावही बोगस : पृथ्वीराज चव्हाण कडाडले

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभा,विधानपरिषद आणि सभागृहाबाहेर भिडे प्रकरण चांगलेच गांजले विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले मात्र निवेदन करताना ते संभाजी भिडेंचा उल्लेख करताना वारंवार ‘भिडे गुरुजी’ असा उल्लेख करत होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आणि मनोहर कुलकर्णी यांचा वारंवार ‘भिडे गुरुजी’ असा उल्लेख का करता ? त्यांच्या नावाची काही शहानिशा केली आहे.भिडे फर्ग्यूसनमध्ये प्राध्यापक होता,अमूक तमूक विषयात पीएच.डी केली, असे पसरवले जाते.त्याचे नावही बोगस आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला गुरुजी संबोधणे योग्य नाही, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘गुरुजी’ म्हणण्याला काही पुरावा आहे का असा खडा सवाल उपस्थित केला.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात, आता तुम्हाला ‘बाबा’ का म्हणतात याचा काही पुरावा आहे का? त्यामुळे भिडेंना गुरुजी म्हणतात, त्याचा पुरावा काय द्यायचा. ते आम्हाला ‘गुरुजी’ वाटतात म्हणून आम्ही ‘गुरुजी’ म्हणतो, असे उत्तर दिले. दरम्यान, विरोधकांचे यामुळे समाधान झाले नाही, उलट फडणवीस त्याचे समर्थन करत असल्याने त्यांनी सभागृहात एकच गदारोळ झाला.

Previous articleविकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका : भडकलेल्या बाळासाहेब थोरातांची मागणी
Next articleमाजी विशेष पोलीस महानिरीक्षकांचा भाजपामध्ये प्रवेश