मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील दिलीप ढोले यांची उचलबांगडी; मिरा भाईंदर पालिका आयुक्तपदी संजय काटकर

मुंबई नगरी टीम

मुंबई । मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकांशी कथित घोटाळ्याशी संबंधी मनी लाँड्रिंगच्या तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले असतानाच राज्य सरकारने त्यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे.त्यांच्या जागी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांशी कथित घोटाळ्याशी संबंधीत मनी लाँड्रिंगच्या तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.हे समन्स बजावल्यानंतर आज राज्य सरकारने तातडीने दिलीप ढोले यांची मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे.त्यांच्या जागी आयुक्त म्हणून संजय काटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.संजय काटकर हे सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक होते. दिलीप ढोले यांनी २०२१ मध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.त्यापूर्वी ठाणे महानगरापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.फडणवीस सरकारच्या काळात ते तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे ते खाजगी सचिव होते.२०२० मध्ये त्यांची मीरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना काळात मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांची बदली करण्यात येवून, त्यांच्या जागी ढोले यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार
Next articleसामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण ?