राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून, राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ  पूर्ण झाल्याने राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदान १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणून सेवा बजावली. त्याचबरोबर त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे. मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी  मदान यांचे स्वागत केले. आयोगातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल  पूर्ण झाला.

Previous articleखुशखबर !  वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ
Next articleभगत सिंह कोश्यारी यांनी घेतली मराठीतून राज्यपाल पदाची शपथ