शिक्षकांच्या आंदोलनाला यश : राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील विनाअनुदानित व अंशत अनुदानित शिक्षक तसेच अघोषित शाळांतील शिक्षकांना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा दिलासा दिला आहे. अनुदानाचा २० टक्के टप्पा देण्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.या निर्णयाचा राज्यातील विनाअनुदानित व अंशत: ६० हजार शिक्षकांना लाभ होणार आहे.विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यातील शिक्षक गेली ३९ दिवस आझाद मैदानावर आंदोलन करीत होते.त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले आहे.

या मागणीसाठी राज्यातील शिक्षक गेली ३९ दिवस आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे.आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत २० टक्केअनुदान वाढीच्या टप्प्यास आज तत्वत: मंजुरी दिली आहे असल्याची माहिती शिक्षणमंत्री केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या शाळा २० टक्के अनुदानावर होत्या, त्यांना ४० टक्के,ज्या ४० टक्केवर होत्या त्यांना ६० टक्के तर ज्या शाळा ६० टक्क अनुदानावर होत्या त्यांना आता ८० टक्के अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यावर १ हजार १६० कोटीचा बोजा येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

Previous articleदुप्पटीने वाढ : आता स्वातंत्र्य सैनिकांना मिळणार दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन
Next articleमंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी