हिंदुत्वापासून दूर गेल्याने उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची प्रतीके असलेली चिन्हे मागण्याचा अधिकार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हिंदुत्वापासून दूर गेल्याने त्यांना हिंदुत्वाची प्रतीके असलेले त्रिशूळ,उगवता सूर्य आणि गदा हे निवडणूक चिन्हे मागण्याचा अधिकार नाही नसून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याने या चिन्हांवर आमचाच अधिकार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्याने अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्रिशूळ,उगवता सूर्य आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे तर त्रिशूळ,उगवता सूर्य आणि गदा हे चिन्ह आपल्या गटाला मिळावे अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.चिन्हावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हिंदुत्वापासून दूर झाला आहे, त्यामुळे हिंदुत्वाची प्रतीके असलेली निवडणूक चिन्हे मागण्याचा त्यांना अधिकार नाही असा घणाघात केसरकर यांनी केला आहे. त्रिशूळ,उगवता सूर्य आणि गदा अशी हिंदुत्वाचे प्रतीके असलेल्या चिन्हांवर आमचाच अधिकार आहे. असा दावादी त्यांनी केला.

अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.आम्ही वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला होता.मात्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी या दोन पक्षांसोबत गेले. वर्षाच्या बाहेर रस्त्यावर उभे राहून भेटीसाठी आम्ही दहा वेळा फोन केले मात्र प्रवेश मिळत नव्हता असा आरोपही केसरकर यांनी केला.राज्यातील जनतेची आणि शिवसेनेची दिशाभूल केली जात आहे.उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाल आदर आहे.मात्र आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देणे गरजेचे आहे.असे केसरकर म्हणाले.ज्या भाजपला शिवसेनेचे नेते शिव्या घालत आहेत त्या भाजपसोबत तुम्ही का जायला तयार होता असा सवाल त्यांनी केला.

Previous articleयापूर्वी ‘मशाल’ चिन्ह कोणत्या पक्षाचे होते ? कोणत्या कारणामुळे शिंदे गटाला ‘गदा’ चिन्ह नाकारलं
Next articleशिंदे गटाला ‘ ढाल तलवार’ चिन्ह ; आता मशाल विरूद्ध ढाल तलवार सामना रंगणार