सर्वात मोठी बातमी : ठाकरे गटाला मोठा धक्का ; शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह

मुंबई नगरी टीम

मुंबई । निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादावर मोठा निर्णय दिला असून, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला असल्याने या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला ढाल तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे तात्पुरते चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता.पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वाद सुरू होता.यावर आज निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून,शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय दिला असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान हा निकाल खोट्याचा निकाल असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आजचा विजय हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आणि भारतीय घटनेचा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हातातून निसटल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नाव शिवसेना आणि त्यांचे चिन्ह धनुष्यबाण असेल तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या गटाला मशाल हे चिन्ह असणार आहे.

Previous articleशिर्डीला समृद्धी, वंदे भारतनंतर तिसरी भेट ; आता रात्रीही विमानाने शिर्डीला जाता येणार
Next articleआयोगाच्या निर्णयानंतर काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ? उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला