राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ६ दिवस चालणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले आणि राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होत असून,हे पावसाळी अधिवेशन केवळ ६ दिवस चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.अधिवेशनाच्या कालावधी आणि कामकाजावर उद्या गुरूवारी होणा-या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.

पुढे ढकलण्यात आलेले राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी १७ ते २६ ऑगस्ट असा असला तरी शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दहिहंडीची सुट्टी असल्याने तर शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या तीन दिवसात कामकाज होणार नसल्याने अधिवेशन केवळ ६ दिवस चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचे पहिलेच अधिवेशन असून,अधिवेशनाच्या पहिल्याच अध्यादेश पटलावर ठेवण्यात येवून २०२२-२०२३ च्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत.१८ ऑगस्ट रोजी शासकीय कामकाज तर २२ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा करण्यात येवून मतदान घेण्यात येईल.मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा करण्यात येईल.बुधवारी २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम आणि शासकीय कामकाज तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासकीय कामकाज घेण्यात येणार आहे.अधिवेशनाचे कामकाज आणि कालावधी निश्चित करण्यासाठी उद्या गुरूवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Previous articleमंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleशिंदे सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका ! म्हणाले..मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा,धुळफेक करणारा