एमआयएमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

एमआयएमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई नगरी टीम

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर एमआयएमने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.यामध्ये वडगाव शेरी,नांदेड उत्तर,आणि मालेगाव मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा केव्हाही घोषित होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि भाजपातील जागा वाटपाची बोलणी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतलेल्या एमआयएमने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.त्यानुसार पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना उमेदवारी दिली आहे.मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक आणि नांदेड उत्तर मधून मोहम्मद फिरोज खान ( लाला) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

 

 

Previous articleराज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार!
Next articleकाँग्रेस राष्ट्रवादीचे हे नेते आज भाजपात प्रवेश करणार