विधानपरिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत आपले उमेदवारी अर्ज  प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ईमेलद्वारे पाठवावेत असे आवाहन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या आगामी काळात रिक्त होणा-या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे.या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्जाचा नमुना टिळक भवन येथे उपलब्ध आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत [email protected], [email protected] या ईमेलवर पाठवावेत.यासंदर्भात काही अडचण आल्यास कार्यालय अधिक्षक श्री. नामदेव चव्हाण मो. क्र. 9820126629 यांच्याशी संपर्क साधावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleजात प्रमाणपत्र पडताळणीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढा
Next articleआरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी घेतली खासदार संभाजीराजेंची भेट