राज ठाकरेंनी सफाई कामगारांची पूर्ण केली ‘ही’ इच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून,कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदी नंतर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपल्या समस्या घेवून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर जाताना राज्यातील जनतेने पाहिले आहे.मात्र दिवाळीच्या सणांत राज ठाकरे यांनी मुंबईतील सफाई कामगारांची एक इच्छा पूर्ण केली आहे.त्याची आज दिवसभर चर्चा आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे टेनिस प्रेम सर्वांनाच माहित आहे.काल नेहमी प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कात टेनिस खेळायला गेले होते.त्यावेळी शिवाजीपार्क परिसरात काम करणा-या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांनी राज ठाकरे यांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली.दिवाळीच्या सणांमध्ये मुंबईत स्वच्छतेसाठी झटणा-या या सफाई कामगारांची विनंती राज ठाकरे यांना मान्य करीत आपले हात या सफाई कर्मचा-यांच्या खांद्यावर ठेवत त्यांना या कर्मचा-यांना दिलखुलासपणे फोटो दिला.मुंबई दिवसरात्र स्वच्छ ठेवणा-या या सफाई कर्मचा-यांना या फोटोच्या माध्यमातून ख-या अर्थांने कोविड योध्दा असल्याचे प्रशस्तीपत्रक दीपावलीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता.

Previous articleही ‘श्रींची इच्छा! सोमवारपासून राज्यातील मंदिरे,प्रार्थनास्थळे उघडणार
Next articleभाजपाने ठरविले तर खरचटायचे दूरच,रक्तबंबाळ व्हाल !