जेंव्हा मंत्री छगन भुजबळ चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध होतात..!

मुंबई नगरी टीम

नाशिक । राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे एका चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.छगन भुजबळ हे आज नाशिक येथील येवला दौ-यावर असताना त्यांना ऐका चिमुरडीने स्वतःचे गाणे ऐकण्याची विनंती केली.भुजबळांनी देखील लगेच होकार देत तिला गायला सांगितले आणि तिच्या आवाजातीस सुंदर गाणे ऐकत भुजबळ मंत्रमुग्ध झाले.

येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील गौतम पगारे यांची कन्या आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना गाणे ऐकवले. यावेळेस भुजबळ यांनी चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक देखील केले. यावेळी उपस्थित नागरिक देखील आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे याचे विशेष कौतुक असल्याचे देखील भुजबळ म्हणाले.यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी संगीत क्षेत्रात तिचे भविष्य उज्वल असून तिला शक्य तेवढी मदत करण्याचा शब्द आम्रपाली व तिच्या वडिलांना दिला आहे.

Previous articleप्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी ;२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !
Next article५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील,या संजय राऊतांच्या वक्तव्यात आत्मविश्वासाचा अभाव