शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावल्या

मुंबई नगरी टीम

हिंगोली । राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री आणि हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असून,त्या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.गायकवाड यांच्या गाडीला भरधाव टेम्पोने मागच्या बाजूने धडक दिली असली तरी सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

राज्याच्या शिक्षणमंत्री आणि हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या दौ-यावर असून,आज हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन करुन त्या रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या असता, त्याच वेळी पाठीमागून येणा-या भरधाव महिंद्रा पीकअपने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला जोरदार धडक दिली.यामध्ये गाडीच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले असले तरी या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.या अपघातातून गायकवाड थोडक्यात बचावल्या आहेत.शिक्षणमंत्री गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Previous articleनाना पटोले हे महाराष्ट्राचे ‘पप्पू’ ! चंद्रकांत पाटलांची टीका
Next articleबैलगाडी तुटली,काँग्रेसचे नेते जमिनीवर कोसळले ; बातमीसह बघा व्हिडीओ !